कारवाईमध्ये भेदभाव करू नका

.
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या हवाला प्रकरणात प्राप्तिकर खात्याने दिल्लीत चिनी कंपन्यांच्या परिसरात झडतीसत्र राबवून चौकशी केली. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या चिनी वकिलातीने आज निवेदन जारी करून या प्रकरणात भारत सरकारने भेदभाव न करता कारवाई करावी, असे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली:  एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या हवाला प्रकरणात प्राप्तिकर खात्याने दिल्लीत चिनी कंपन्यांच्या परिसरात झडतीसत्र राबवून चौकशी केली. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या चिनी वकिलातीने आज निवेदन जारी करून या प्रकरणात भारत सरकारने भेदभाव न करता कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. तसेच परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, अशा सूचनाही दिल्या.

 लडाखमध्ये भारतीय हद्दीत चिनी सैन्याची घुसखोरी आणि १५ जूनच्या हिंसक झटापटीमध्ये २० भारतीय जवानांचा झालेला मृत्यू यामुळे भारतात चीनविरोधी वातावरण तापले असून दोन्ही देशांमधील संबंध ताणल्या गेले आहेत. या तणावामुळे चीनशी आर्थिक व्यवहार करताना भारताने हात आखडता घेतला असून चिनी अॅपवरही बंदी घातली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने भंडाफोड केलेल्या या हवाला गैरव्यवहारामध्ये चिनी नागरिकांचा समावेश असल्याचे आढळल्यानंतर चिनी वकिलातीची अस्वस्था वाढली.

काळा पैसा पांढरा केला 
काही चिनी नागरिकांनी  त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांसमवेत बनावट संस्थांची साखळी उभारून काळा पैसा पांढरा करण्याचा हवाला व्यवहार चालविल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राप्तिकर खात्याने या  संस्थांच्या परिसरात तसेच त्यांच्या जवळचे व्यक्ती आणि संबंधित बॅंक कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी शोध मोहीम राबविली. 

संबंधित बातम्या