आताच करा 'हे' काम अन्यथा PM Kisan Samman Nidhi चा 13वा हप्ता खात्यात जमा होणार नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही यातील सर्वात पसंतीची योजना आहे.
PM Kisan Samman Nidhi
PM Kisan Samman NidhiDainik Gomantak

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही यातील सर्वात पसंतीची योजना आहे. (PM Kisan Samman Nidhi)

या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

26 जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हप्ता कधी मिळणार याबाबत सरकारने अधिकृत कोणतेही वक्तव्य केलं नाही.

नियमात काही बदल करण्यात आल्याने काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता मिळणार नसल्याचे समोर आले आहे. काही शेतकऱ्यांनी (Farmer) पीएम किसान योजनेसाठी लागणारी सगळी कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांना सध्याचा मिळणार नाही. 

PM Kisan Samman Nidhi
Joshi Math Sinking : कशी आहे जोशीमठची सध्याची स्थिती? तीन दिवसांत भेगा वाढल्या नाहीत, वाचा सविस्तर

जमीन आणि लाभार्थी शेतकऱ्यांचं रेकॉर्ड सेंट्रल डेटाबेसमध्ये अपडेट करण्यात आलेलं नाही. केंद्रातल्या सरकारने गैरप्रकार थांबण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत काही कागदपत्रे अपडेट करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं.

  1. शेतकरी खरोखरच त्या जमीनीचा मालक आहे, त्याच्या जमिनीची सरकार दरबारी नोंद आहे.

  2. शेतकऱ्यांच्या वेबसाईटवरती शेतकऱ्याची ई-केवाईसी पुर्ण असावी

  3. शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार कार्डला जोडलेले असावे

  4. त्याचबरोबर बँक खाते भारतीय राष्ट्रीय निगम पेमेंटशी संबंधित असणे आवश्यक आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com