तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का ? राहुल गांधीनी दिलं उत्तर

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का ? राहुल गांधीनी दिलं उत्तर
Do you have a girlfriend Rahul Gandhi gave the answer

पुदुचेरी : राजकिय नेते त्यांच्या राजकिय जीवनाबरोबर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील चर्चांसाठी सुध्दा प्रसिध्द असतात. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सुध्दा त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे पुन्हा एखदा चर्चेत आले आहेत. पुदुचेरी दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमामध्ये मुलांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रीयेसीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला असता कार्यक्रमात एकच हशा पिकला. भर कार्यक्रमात एका मुलीने त्यांना प्रियसेच्या संदर्भातील प्रश्न विचारला होता.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी या क्रार्यक्रमात त्यांच्या नेहमीच्या वेशभूषेत यावेळी पहायला मिळाले नाहीत. त्यांनी यावेळी टिशर्ट आणि पॅन्ट अशी वेशभूषा परिधान केली होती. त्यांचा हा लूक एकदम यंग दिसत होता. मुलांनी या क्रार्यक्रमात त्यांना अनेक वैयक्तिक जीवनाच्या संदर्भातील प्रश्न विचारले. याचवेळी राहुल गांधी यांना एका मुलीने सर म्हणत प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली यावेळी राहुल यांनी 'मला सर म्हणू नका, तुम्ही तुमच्या मुख्यध्यापकांना सर म्हणा मला फक्त राहुल म्हणा’ असे म्हटल्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवत राहुल गांधी या दाद दिली होती. याच दरम्यान राहुल गांधी यांना सर म्हणून आवाज देणाऱ्या मुलीने आपला अर्धवट राहिलेला प्रश्न पूर्ण करत त्यांना तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी या प्रश्नाचे उत्तर मी एखाद्या वेगळ्या कार्यक्रमात देतो असं यावेळी म्हटलं. राहुल गांधींनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. 

कार्यक्रमात इतर मुलांनी राहुल गांधी यांना अनेक प्रश्न विचारले, तुम्हाला मित्र आहेत का?, तुम्हाला मैत्रीणी आहेत का ? मित्र असतील ते कोणत्या क्षेत्रात काम करतात. यावर राहुल यांनी सांगितले की, ‘’मला अनेक मित्र आहेत. काही राजकारणात आहेत. काही राजकारणाबाहेरचे आहेत. काहीजण मला शत्रू मानतात. तर काहीजण मला मित्र मानतात. मात्र मी त्यांना आजही मित्रच मानतो’’ असं राहुल यांनी उत्तर दिलं.

एलटीटीईने तुमच्या वडिलांची हत्या केली या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना,‘’माझ्या वडिलांची हत्या झाली होती त्यावेळी मला खूप दु:ख झालं होतं. मात्र मी या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांना माफ करतो. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा रोष नाही.’’

      
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com