"कोरोनाशी लढा पंतप्रधानांशी नाही"; ट्वि़ट युद्ध सुरुच

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या  ट्विटनंतर मोठे वादंग सुरु झाल्याचे पाहायला मिळले आहे.

पंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी आपली फोनवरून चर्चा झाली, तेव्हा त्यांनी फक्त त्यांची मन कि बात सांगितली अशी टीका झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या या ट्विटनंतर मोठे वादंग सुरु झाल्याचे पाहायला मिळले आहे. यावरच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी "मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीविरूद्ध नव्हे तर कोरोनाविरूद्धच्या लढ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे." असे म्हणत सोरेन यांच्यावर पलटवार केला आहे. (Doctor Harsh Vardhan said the fight with Corona is not with the Prime Minister)

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "हेमंत सोरेन जी, कदाचित त्यांच्या पदाचा मान विसरला असेल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत देशाच्या पंतप्रधानांना विधान करताना त्यांनी हे विसरू नये की या साथीचा अंत केवळ सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे. आपले अपयश लपवण्यासाठी पंतप्रधानांवर टीका करणे लज्जास्पद आहे. ''

ते पुढे म्हणाले, "कोरोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी तिजोरी उघडली आहे, झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. केंद्र सरकारनेच सर्व काही करावे अशी हेमंत सोरेन जी यांची इच्छा आहे. कोरोनाशी लढा, पंतप्रधान नाही!" भारतीय जनता पक्षाने आत पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या या विधानावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते आहे. आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल, भाजप नेते हेमंत बिस्वा यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी सोरेन यांच्या या विधानाचा निषेध केले आहे

संबंधित बातम्या