दहशतवादाचा आरोप असणारा डॉक्टर मागतोय रुग्णसेवेची परवानगी

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

मागच्या वर्षी सौदी अरेबीयाकडुन प्रत्यार्पण झाल्यानंतर या आरोपीला भारतात आणले गेले आहे. 

अल-कायदा (AL KAYDA) या दहशतवादी (Terrorist) संघटनेचं काम करत असल्याचा आरोप असलेल्या एका एमबीबीएस डॉक्टरने (MBBS Doctor) दिल्लीच्या पटीयाला हाऊस (Patilyala House) कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. कोरोना महामारीच्या या काळात आपण तिहार जेलमध्ये (Tihar Jail) असलेल्या कैद्यांवर उपचार करू इच्छितो, त्यासाठी आपल्याला परवानगी दिली जावी, अशी मागणी आरोपीने या याचिकेमध्ये केली असल्याचे समजते आहे. मागच्या वर्षी सौदी अरेबीयाकडुन प्रत्यार्पण झाल्यानंतर या आरोपीला भारतात आणले गेले आहे. (The doctor, who is accused of terrorism, asked for permission to serve the patient)

विशेष न्यायमूर्ती धर्मेंद्र राणा  समोर बुधवारी दाखल झालेल्या या याचिकेत आरोपी असलेल्या डॉ. सबील अहमद यांनी वैद्यकीय वक्षेत्रातील आपल्या अनुभवाचा उपयोग तिहार जेल मधील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि एकूणच सर्व कोरोना प्रकरणे हाताळण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो असे म्हटले आहे. आरोपीचे वकील एम.एस.खान यांनी या कामासाठी जेल प्रशासनने परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आरोपी हा एमबीबीएस डॉक्टर असून त्याला सात वर्ष गंभीर आजारांवर उपचार करण्याचा अनुभव आहे असाही उल्लेख या याचिकेमध्ये वकिलांनी केला आहे. 

अखेर स्पुटनिक-व्ही भारतात दाखल; लसीकरणाला मिळणार बळकटी

आरोपी डॉ. सबील अहमद हा अल-कायदा-इन-द-इंडियन-सब-काँटिनेन्टल या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने 22 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. या आरोपीवर भारत आणि विदेशात दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम केले असल्याचे आरोप आहेत. 

संबंधित बातम्या