''लक्षद्विपचा दुसरा काश्मीर बनवताय का?'' विरोधकांचा प्रशासकाला प्रश्न 

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 मे 2021

प्रफुल्ल पटेल यापूर्वी दादरा नगर हवेली, आणि दिव दमन या केंद्र शासीत प्रदेशाचे प्रशासक होते.

लक्षद्विप केंद्रशासित प्रदेशाचे (Lakshadweep) नवे प्रशासक प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या कारभारावरुन सध्या त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षांनी पटेल यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. केंद्रशसित प्रदेश असलेल्या लक्षद्विप येथे पाच महिन्यांपूर्वीच प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पटेल त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहत होते. लक्षद्विप या केंद्र शासित प्रदेशामध्ये 90 टक्के जनता मुस्लिम (Muslim) आहे. दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूकीत अपात्र ठरवण्याचा निर्णय आणि प्रदेशात गोमांसावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडल्याने लक्षद्विपमध्ये मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांनीही लक्षद्विपचा दुसरा काश्मीर (Kashmir) बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. प्रफुल्ल पटेल यापूर्वी दादरा नगर हवेली, आणि दिव दमन या केंद्र शासीत प्रदेशाचे प्रशासक होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पटेल यांनी लक्षद्विपचा कार्यभार स्वीकारला होता. (Does Lakshadweep make another Kashmir Opposition asked the administrator)

तेव्हापासून लक्षद्विप प्राणी संरक्षण नियमन, लक्षद्विप असामाजिक उपक्रम नियमन प्रतिबंधक कायदा, लक्षद्विप विकास प्राधिकरण नियमन आणि लक्षद्विप पंचायत कर्मचाऱ्यांच्या नियमन दुरुस्ती या संदर्भात पटेल यांनी मसुदा तयार केला आहे.

केंद्र सरकार फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर कारवाईच्या तयारीत

तर दुसरीकडे खासदार मोहम्मद फैजल यांच्या मते, प्रशासनाने प्रस्तावित केलेले नियम आणि मसुद्यासंदर्भात लोक प्रतिनिधींचा सल्ला विचारात घेण्यात आला नव्हता असे म्हटले आहे. या निर्णयामुळे लक्षद्विपमध्ये अशांतता पसरु शकते असे फैजल यांनी म्हटले आहे.स्वातंत्र्यानंतर गेल्या सत्तर वर्षात लक्षद्विप बेटांचा विकास झालेला नाही. आणि प्रशासन केवळ विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे पटेल यांनी सांगितले.

''लक्षद्विपमधील जनतेचा नव्हे तर ज्यांचे या निर्णयामुळे नुकसान होणार आहे तेच लोक विरोध करत आहेत. अन्यथा, विरोध करण्यासारखे यामध्ये मला काहीही चुकीचे वाटत नाही. लक्षद्विप बेटे मालदिवपासून फारशी दूर नाहीत मात्र आज मालदीव जागतिक पर्यटनस्थळ आहे मात्र लक्षद्विपमध्ये इतक्या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आम्ही येत्या काळात लक्षद्विपला जागतिक पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत,'' असे पटेल यांनी म्हटले आहे.

बिहार: ऐन कोरोना काळात आरोग्य केंद्राची केली गोशाळा

लक्षद्विपमध्ये गोमांस बंदीमुळे केंद्र शासित प्रदेशात अशांतता निर्माण झाली आहे. नव्या मसुद्यानुसार कोणतीही व्यक्ती लक्षद्विपमध्ये कोठेही कुठल्याही स्वरुपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गोमांस किंवा गोमांस उत्पादनांची खरेदी, विक्री, साठवण वाहतूक करु शकणार नाही. या नव्या नियमांचे उल्लंघन झाल्यास दोषी व्यक्तिंना 7 ते 10 तुरुंगावासाची शिक्षा आणि 1 ते 5 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा केली जाऊ शकते.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येसाठी पटेल यांना जबाबदार धरण्यात येत आहे. पहिल्या कोरोनाच्या लाटेदरम्यान लक्षद्विप बेटांवरती एकही कोरोना रुग्ण नव्हता. मात्र आता बेटांवर प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसार चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या