Hyderabad: भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला; हैदराबादमध्ये 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

हैदराबादमधुन 5 वर्षाच्या चिमुकल्या एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Hyderabad
HyderabadDainik Gomantak

हैदरामध्ये एक हृदयद्रावक टना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील एका हाऊसिंग सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाल्याने प्रदिप या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

या हृदयद्रावक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हा मुलगा रस्त्यावर जातांना दिसत आहे. दरम्यान, दोन ते तीन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये तो मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे वडिल गाधर हे वॉचमॅनचे काम करतात.त्या मुलाच्या वडिलांनी सांगितले की मुलाच्या रडण्याचाआवाज ऐकुन ते घटनास्थळी पोहोचले आणि मुलाची भट्क्या कुत्र्यांपासून सुटका करुन त्याला लगेच रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी गुजरातमध्येही अशीच घटना समोर आली होती. या घटनेच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी गुजरातमधील सुरतमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. याआधी जानेवारी महिन्यात बिहारमधील अराह येथे एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने 80 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com