भारतीय लष्करात कोरोना निदानासाठी कुत्र्यांची मदत

Dogs to help diagnose corona in Indian Army
Dogs to help diagnose corona in Indian Army

नवी दिल्ली: एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी कुत्र्यांची किंवा श्वानपथकांची नेहमीच मदत घेतल जाते. मात्र, आता भारतीय लष्कराकडून कोरोनाच्या तत्काळ निदानासाठी कुत्र्यांचा वापर केला जात आहे. हा देशातील असा पहिलाच प्रयोग असून कोरोनाच्या नेहमीच्या चाचणीतील उशीर टळून लवकर निदानाचा हेतू आहे.

भारतीय लष्करातील कुत्रे आपल्या तीव्र ज्ञाणेंद्रियाच्या क्षमतेमुळे ओळखले जातात. या श्वानांनी स्फोटके आणि अमली पदार्थांच्या तपासातही यापूर्वी मोलाची कामगिरी बजावली आहे. आता ते कोरोना निदानाच्या चाचणीचे आव्हान पेलत आहेत. कोरोना ओळखण्यासाठी दोन कुत्र्यांना लष्कराकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यापैकी कॉकर स्पॅनियल प्रजातीचा कॅस्पर हा कुत्रा दोन वर्षांचा आहे.त्याचबरोबर मूळ तमिळनाडूतील स्वदेशी प्रजातीच्या जया या अवघ्या एक वर्षीय कुत्र्याचा यात समावेश आहे. या दोन कुत्र्यांशिवाय लॅब्राडोर प्रजातीच्या आणखी आठ कुत्र्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.

मीरतमधील श्वान प्रशिक्षण केंद्रातील श्वान प्रशिक्षक ले.कर्नल सुरिंदर सैनी याबाबत म्हणाले की, "प्रशिक्षणानंतर या कुत्र्यांना नोव्हेंबरमध्ये लष्कराच्या दिल्लीतील संक्रमण छावणीत ठेवले जाईल. त्यानंतर, डिसेंबरपासून चंदिगडमधील संक्रमण छावणीत त्यांचा मुक्काम असेल. या छावणीतून लडाख परिसरासह मोठ्या क्षेत्रात लष्कर पाठविले जाईल."

कसे दिले जाते प्रशिक्षण ?
या दोन्ही कुत्र्यांना मानवी घाम व लघवी हुंगण्यास दिली जात आहे. कोरोना झालेल्या रुग्णाच्या घाम व लघवीतून बाहेर पडलेल्या विशिष्ट जैविक घटक (बायोमार्कर) ओळखण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. यात कोरोनाचा जिवंत विषाणू मात्र नसेल. नमुना पॉझिटिव्ह असल्यास त्यापुढे बसण्याचे व निगेटिव्ह असल्यास पुढे चालत जाण्याचे प्रशिक्षण कुत्र्यांना दिले आहे. दिल्ली कॅन्टोन्मेटमधील लष्करी पशुवैद्यकीय रुग्णालयात या कुत्र्यांकडून काल  मंगळवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी, त्यांना हाताळणाऱ्यांनी पीपीई किट घातली होती.

कोरोना निदानासाठी दोन कुत्र्यांचा केवळ लष्करात नव्हे तर भारतातही प्रथमच वापर होत आहे. यासाठी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आदी देशांत  प्रशिक्षित कुत्र्यांचा यापूर्वीपासूनच वापर केला जातो. परदेशांत मलेरिया, मधुमेह आणि पार्किन्सनच्या आजारांच्या निदानासाठी कुत्र्यांची मदत घेतली गेली. भारतात वैद्यकीय निदानासाठी कुत्र्यांची मदत घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
-ले.कर्नल सुरिंदर सैनी, श्वान प्रशिक्षक, श्वान प्रशिक्षण केंद्र, मीरत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com