IAS KK Pathak: 'उल्लू के पट्ठे, इडियट...', IAS केके पाठक यांच्या नव्या व्हिडीओवरुन गदारोळ

Bihar: बिहारचे अधिकारी वगळता इतर आयएएस अधिकारी अपमानित होताना दिसत आहेत.
IAS KK Pathak
IAS KK PathakDainik Gomantak

IAS KK Pathak: बिहारचे आयएएस केके पाठक यांच्या शिवीगाळ करणाऱ्या व्हिडीओचा वाद अजूनही थांबलेला नाही तोच, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये केके पाठक एक पाऊल पुढे गेले आहेत. आणि यावेळी बिहारचे (Bihar) अधिकारी वगळता इतर आयएएस अधिकारी अपमानित होताना दिसत आहेत.

अपमानास्पद केके यादव व्हिडीओ भाग 2

दुसरा व्हिडीओही या बैठकीचा आहे. ज्यामध्ये ते म्हणतायेत की, सगळे साले आहेत. एका अधिकाऱ्याला फटकारताना ते म्हणाले की, "उल्लू का पट्टा, मूर्ख, गाढव... मग ते म्हणाला की, हे सगळे साले आहेत, गाढव आहेत." केके पाठक हे दारुबंदी विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक आहेत.

IAS KK Pathak
Delhi Crime: छावला सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पुन्हा गजाआड, SC ने 3 महिन्यांपूर्वी...

बिहारमध्ये सगळे हरामी, सामान्य माणूस कोण?

व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये के.के.पाठक कॉरपोरेट संदर्भात बैठक घेत होते. यावेळी ते पुढे म्हणतात की, 'या सगळ्या साल्यांना काढून टाका, आम्ही सर्व काही स्वतःशी शेअर करु.' के.के.पाठक पुढे असे म्हणतात की, सगळे बदमाश डोकं हलवत राहतात.

IAS KK Pathak
Rajasthan Crime: धक्कादायक! पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघेजण गजाआड

नुकताच, IAS केके पाठक यांचा एक अपमानास्पद व्हिडिओ समोर आला होता. त्याबाबत बिहार प्रशासन सेवा संघाने निषेध करत तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीही या प्रकरणावर मुख्य सचिव या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याचे वक्तव्य केले. पण पुन्हा एकदा केके पाठक यांचा शिवीगाळ करणारा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरुन गदारोळ होणार हे निश्चित दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com