भटकळचे रुग्ण कारवारात नको

Dainik Gomantak
बुधवार, 13 मे 2020

कारवार जिल्ह्यात भटकळ वगळता इतर कुठेही कोरोना चा प्रादुर्भाव नाही म्हणून त्या रुग्णांना भटकळ मधेच औषधोपचाराची व्यवस्था करावी

चैतन्य जोशी

कारवार

 भटकळ येथील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना कारवारमध्ये उपचारासाठी आणू नये. त्यांच्यावर त्या परिसरात असलेल्याच इस्पितळांत उपचार करावेत अशी मागणी कारवारमधून होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाला नागरीक तशी निवेदने आता देऊ लागले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. के हरीश कुमार यांनी कारवारमध्ये भटकळमधील रुग्णांना आणण्याची घाई केली. त्यामुळे कारवारवासियांचे आरोग्य धोक्यात आले अशी प्रतिक्रीया समाजमाध्यमांवर उमटू लागल्या आहेत. कारवार जिल्ह्यात भटकळ वगळता इतर कुठेही कोरोना चा प्रादुर्भाव नाही म्हणून त्या रुग्णांना भटकळ मधेच औषधोपचाराची व्यवस्था करावी असे मत कारवारचे वकील आर. व्ही. भट यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले कारवारचे वैद्यकीय महाविद्यालय कारवारच्या सरकारी इस्पितळात आहे. त्यामुळे सर्वसामान्य औषधोपचारासाठी याच इस्पितळावर अवलंबून आहे. आता त्याच इस्पितळात कोरोनाबाधीतांना आणल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  भटकळच्या लोकांना मंगळूर येथील एका खासगी रुग्णालयातून ही लागण लागली आहे हे माहीत असूनही भटकळच्या सर्वांना इथे आणणे बरोबर नव्हे. इस्पितळातील सांडपाणी भुयारी गटारामार्गे समुद्रात जाते त्यामुळे विषाणू शहरभर पसरण्याची भीती वाटते.

संबंधित बातम्या