Amit Shah On ITBP: वर्षाच्या शेवटी अमित शहांचं मोठं वक्तव्य, 'भारत-चीन सीमेची चिंता नाही कारण...'

अमित शाह म्हणाले की, 'मला चीन आणि भारताच्या (इंडिया-चीन एलएसी) सीमेबाबत पूर्ण खात्री आहे.
Amit Shah
Amit Shah Dainik Gomantak

Amit Shah On ITBP: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी बंगळुरुमध्ये सुरक्षा दलांचे कौतुक केले. शाह म्हणाले की, 'मला चीन आणि भारताच्या (इंडिया-चीन एलएसी) सीमेबाबत पूर्ण खात्री आहे. विशेष म्हणजे, देशाची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही.' इंडो-तिबेट बॉर्डर जवानांचे (आयटीबीपी) कौतुक करताना शाहांनी त्यांना 'हिमवीर' असे संबोधले. ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा ते सीमेवर गस्त घालत असतात, तेव्हा कोणीही देशाच्या एक इंच जमिनीवरही अतिक्रमण करु शकत नाही.'

'आयटीबीपी अत्यंत कठीण परिस्थितीत काम करते'

ITBP जवानांचे कौतुक करताना शहा पुढे म्हणाले की, 'कठीण परिस्थितीत आपले जवान सीमेचे रक्षण करतात, त्यांच्यासाठी 'हिमवीर' ही पदवी पद्मश्री आणि पद्मविभूषणपेक्षा मोठी आहे.' ITBP च्या सेंट्रल इंटेलिजन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन केल्यानंतर शाह म्हणाले की, "उणे 42 डिग्री सेल्सिअस तापमानात ते आपल्या सीमांचे रक्षण कसे करतात याची आपण कल्पनाही करु शकत नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि देशप्रेमाची सर्वोच्च सेवा या भावनेनेच हे घडू शकते.'' ITBP अरुणाचल प्रदेश, लडाख किंवा जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) कठीण भौगोलिक परिस्थितीत काम करते.

Amit Shah
Amit Shah Meeting: जम्मू-काश्मीरबाबत अमित शाहांनी घेतली महत्त्वाची बैठक, विकास प्रकल्पांसाठी...

शाह पुढे म्हणाले की, 'भारतीय लोक ITBP जवानांना 'हिमवीर' म्हणतात. पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या नागरी पुरस्कारांपेक्षा ही पदवी मोठी आहे. नागरी पुरस्कार हे सरकारी पदव्या आहेत, तर 'हिमवीर' ही भारतातील लोकांनी दिलेली पदवी आहे. सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी, ITPB सर्वात कठीण हवामानात काम करते.'

Amit Shah
Amit Shah On India-China Clash: 'काँग्रेसच्या काळातच चीनने भारताची जमीन बळकावली...,' शहांचा घणाघात

'चीन-भारत सीमेची काळजी करु नका'

गृहमंत्री शहा शेवटी म्हणाले की, 'मी भारत-चीन सीमेबाबत पूर्णपणे निश्चिंत आहे. कधीही काळजी करु नका, जेव्हा आपले ITBP जवान गस्त घालत असतात किंवा तळ ठोकत असतात, तेव्हा आपल्या जमिनीवर कोणीही एक इंचही अतिक्रमण करु शकत नाही. भारत सरकार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) कर्मचार्‍यांना त्यांच्या मुख्यालयात त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी 100 दिवस देण्याची योजना आखत आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून ते आवश्यक आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com