प्रल्हाद जोंशींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री सावंत यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

कर्नाटक योग्य रस्त्यावर असून लवकरच राज्याला म्हादईचे पाणी मिऴेल, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र नकार दिला आहे.​

पणजी-  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केल्याचे आपल्याला समजण्यापलीकडे आहे. कर्नाटक योग्य रस्त्यावर असून लवकरच राज्याला म्हादईचे पाणी मिऴेल, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र नकार दिला आहे.

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळवण्यात आल्याने गोव्यातील राजकारण तापले आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्याशिवाय मी यावर बोलू इच्छित नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, मुळचे कर्नाटकातील रहिवाशी असलेले प्रल्हाद जोशी केंद्रात संसदीय कार्यमंत्र्याच्या कारभाराबरोबरच कोळसा मंत्रायलाचेही मंत्री आहेत. त्यांनी म्हादई प्रश्नावर बोलताना सांगितले की, कर्नाटकाने म्हादई प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन कर्नाटकाला त्याच्या हक्काचे पाणी मिळेल.
 

संबंधित बातम्या