
West Bengal New Governor: डॉ. सीव्ही आनंद बोस यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून एका निवेदनात ही घोषणा करण्यात आली. हा आदेश त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून लागू होईल. दरम्यान, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर देशाचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर एल.ए. गणेशन यांनी हंगामी राज्यपाल म्हणून राज्याचा कार्यभार स्वीकारला होता.
तसेच, सीव्ही आनंद बोस (Dr CV Ananda Bose) यांची नियुक्ती पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक जिंकल्यानंतर काही महिन्यांनी झाली आहे. जुलैमध्ये, मणिपूरचे (Manipur) राज्यपाल एल.ए. गणेशन यांनी राजभवनात बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. गणेशन यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार होता.
राष्ट्रपती भवनाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, "डॉ. सीव्ही आनंद बोस यांची पश्चिम बंगालचे (West Bengal) नियमित राज्यपाल म्हणून नियुक्ती करताना भारताच्या (India) राष्ट्रपतींना आनंद होत आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल."
दुसरीकडे, डॉ.आनंद बोस हे सध्या मेघालय सरकारचे सल्लागार आहेत. 71 वर्षीय CV आनंद बोस यांची नियुक्ती पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर यांची ऑगस्टमध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर काही महिन्यांनी झाली आहे. जुलैमध्ये, मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांनी राजभवनात बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. गणेशन यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.