Draupadi Murmu15th President Of India
Draupadi Murmu15th President Of Indiatwitter

President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या पहिल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Draupadi Murmu15th President Of India: द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे.

देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आज राष्ट्रपती पद (President) आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणुन घेउया. (Draupadi Murmu15th President Of India news)

* द्रौपदी मुर्मू यांनी मानले देशवासियांचे आभार

“आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची 50 वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज 75 व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. 25 वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे,” असं सांगत द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आमदार, खासदार तसंच देशवासियांचे आभार मानले.

* सबका प्रयास, सबका कर्तव्य' , मुर्मू यांचं आवाहन

स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. पुढील 25 वर्षात आपल्याला 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार आहे असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

* जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय

आज मी सर्व देशवासियांना, विशेषतः भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देते की, या पदावर काम करताना त्यांचे हित सर्वोपरि असेल. मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय

Draupadi Murmu15th President Of India
Draupadi Murmu Oath: द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ,15 व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान

* भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

* कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती

ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती, असं मुर्मू यांनी सांगितलं.

* भारतातील गरीब लोक स्वप्न पाहू शकतात

राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात.

* 26 जुलै हा कारगिल विजय दिवस

हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com