Video: DRDO ने केले स्वदेशी बनावटीच्या MISSILE चे यशस्वी प्रक्षेपण

Man-Portable Anti-Tank Guided Missile हे जास्तीत जास्त 2.5 कि.मी. अंतरासाठी असून ते 15 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे आहे.
Video: DRDO ने केले स्वदेशी बनावटीच्या MISSILE चे यशस्वी प्रक्षेपण
Representative Image of Missile Dainik Gomantak

भारत आणि भारतीय लष्कराला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) बुधवारी स्वदेशी बनावटीचे लो वेट, फायर अ‍ॅण्ड फॉरगेट मॅन पोर्टेबल अँटी टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) ची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र थर्मल साईटसह मॅन पोर्टेबल लाँचरमधून प्रक्षेपित केले गेले होते आणि एका टॅंकला लक्ष्य करण्यात आले होते. DRDOने पुढे सांगितले की, हे क्षेपणास्त्र थेट लक्ष्यावर आदळले आणि अचूकपणे लक्ष्य नष्ट केले. त्यामुळे चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

"या मिशनची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली. या क्षेपणास्त्राची (Man-Portable Anti-Tank Guided Missile) जास्तीत जास्त श्रेणीसाठी यापूर्वी यशस्वीपणे उड्डाण-चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक मिनिएट्युराइज्ड इन्फ्रारेड इमेजिंग सीकरसह बनविण्यात आले असल्याची माहिती DRDO कडुन मिळाली आहे.

Representative Image of Missile
Indian Navy recruitment 2021: 350 नाविक एमआर पोस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

ट्रायपॉडचा वापर करून मॅन-पोर्टेबल क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले असून हे प्रक्षेपण जास्तीत जास्त 2.5 कि.मी. अंतरासाठी असून ते 15 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे आहे.कंट्रोल फ्लाइट टेस्ट यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत आणि गाईडेड फ्लाईट टेस्ट (IIR Seeker) नियोजित असल्याचे DRDO कडुन सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com