DRDO चे लवकरच अ‍ॅंटी कोविड औषध '2DG' होणार लॉन्च

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

कोरोना औषध 2 डीजीच्या 10,000 डोसची पहिली मात्रा पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे.  देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट विनाशकारी ठरत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र मोठ्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसींची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन (Oxygen), औषधांची कमतरता जाणवत आहे. यातच आता लसीकरणात भर टाकण्यासाठी रशियाची (Russia) स्पुटनिक लस (Sputnik Vaccine) पुढच्या आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. या व्यतिरीक्त आणखी एक औषध बाजारात लवकरच दाखल होणार आहे. ज्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. डिआरडिओने (DRDO) विकसित केलेले अ‍ॅंटी कोविड औषध 2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज चे 10,000 डोस पुढच्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहेत. (DRDOs anti covid drug 2DG will be launched soon)

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, कोरोना औषध 2 डीजीच्या 10,000 डोसची पहिली मात्रा पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. हे औषध कोरोना रुग्णांना लवकर बरे करते त्याचबरोबर ऑक्सिजनवर असणाऱ्या कोरोना रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. डीआरडिओच्या उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध उत्पादक भविष्यात या औषधाचे उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी काम करत आहेत.

म्युकोरमाइकोसिस पासून वाचण्यासाठी काय कराल? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

2 डीजी औषधाला अशा वेळी मंजूरी देण्यात आली आहे जेव्हा भारत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त आहे. आणि देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. हे औषध डिआरडिओच्या पथकाने विकसित केलं आहे. या औषधाबद्दल संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, कोविड-19 च्या लाटेमुळे मोठ्या संख्येने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हे औषध कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी बहुमोल असणार आहे. कारण ते संक्रमित पेशींवर कार्य करते.

संबंधित बातम्या