नव्या क्षेपणास्त्रामुळे लष्कराच्या ताकदीत भर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. क्यूआरएसएएम असे या क्षेपणास्त्राच्या नावाचे संक्षिप्त रुप आहे.

बालासोर, ओडिशा :  संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. क्यूआरएसएएम असे या क्षेपणास्त्राच्या नावाचे संक्षिप्त रुप आहे. या क्षेपणास्त्रासाठी वापरले जाणारे रडार एकाच वेळी १०० लक्ष्य ट्रॅक करू शकते आणि सहा लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.

या चाचणीबरोबरच लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पद्धतीच्या संशोधनात्मक चाचण्यांची डीआरडीओने पूर्तता केली. आता लवकरच लष्कराकडून वापराच्या चाचण्या सुरू होतील. हवाई दलाचे जवानही चाचण्या करतील. त्यानंतर हे क्षेपणास्त्र लष्करात समाविष्ट केले जाईल. दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राने निर्धारीत लक्ष्य यशस्वीरित्या भेदले. 

 

संबंधित बातम्या