
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) व्यापारी पियुष जैन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने 430 पानी आरोपपत्राची दखल घेतली आहे. सीएफएसएल चाचणीत सोने 99 टक्के शुद्ध असल्याचे समोर आले आहे. (DRI files charge sheet against businessman Piyush Jain)
विशेष म्हणजे पीयूष जैन यांच्याकडून 23 किलो सोने जप्त करण्यात आले होते, ज्याची डीआरआयकडून चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणात आणखी 4 आरोपी आहेत. न्यायालयाने (Court) आरोपींना समन्स बजावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मे रोजी होणार आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या छाप्यात जैन यांच्याकडे 195 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे.
डीआरआयचे वकील अमरीश टंडन म्हणाले की, पीयूष जैन यांच्या प्रकरणात न्यायालयाने डीआरआयने सादर केलेले 430 पानांचे आरोपपत्र स्वीकारले. न्यायालयाने तथ्ये योग्य ठरवून 309 चे वॉरंट जारी केले. संतोष तिवारी यांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने 167 चे वॉरंट रद्द केले आणि खटला चालवण्यासाठी 25 मे ची तारीख दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.