Drone on PM Modi House: पंतप्रधानांच्या निवासस्थानी संशयास्पद ड्रोन... दिल्ली पोलिसांना आलेल्या फोनमुळे खळबळ

सोमवारी (3 जुलै) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
Drone
DroneDainik Gomantak

Drone on PM Modi House: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडत असल्याची माहिती मिळाल्याने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. ड्रोनबाबत फोन येताच दिल्ली पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

यानंतर ड्रोनचा शोध सुरू करण्यात आला पण पोलिसांना ड्रोन दिसला नाही. असे सांगण्यात येत आहे की दिल्ली पोलिसांना पहाटे 5 वाजता पीएम हाऊसवर ड्रोन उडत असल्याचा फोन आला होता. यापपर्वी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ड्रोन दिसल्याची बातमी आली होती.

Drone
Cheetah Pawan: कुनोच्या पार्कमध्ये चित्ता पवन पुन्हा मोकळ्या जंगलात, पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानावर ड्रोन दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) अॅक्शन मोडमध्ये आले असून या प्रकरणाचा तपास करत आहे. 

यासोबतच नो फ्लाय झोनमध्ये ड्रोन दिसल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींचे निवासस्थान दिल्लीतील लोककल्याण मार्गावर आहे आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर नो फ्लाइंग झोनमध्ये येतो.

  • ड्रोनची चौकशी सुरू

मोदींच्या निवासस्थानाच्या वरच्या नो-फ्लाइंग झोनमध्ये ड्रोन उडवल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस तपासात गुंतले असून ड्रोनचा शोध घेतला जात आहे. यासोबतच पीएम हाऊसवर ड्रोन उडवल्या प्रकरणी एसपीजीनेही चौकशी सुरू केली आहे. पण अद्याप ड्रोनची माहिती मिळाली नाही. याबाबत एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम (ATC) शीही संपर्क साधण्यात आला आहे, पण एटीसीला पीएम हाऊसभोवती कोणतीही उडणारी वस्तू सापडली नाही.

  • 12 एकरात पसरले निवासस्थान

दिल्लीतील लोककल्याण मार्गावर असलेले पीएम मोदींचे हाऊस 12 एकरात पसरले आहे. येथे पोहोचण्यासाठी लोकांना कडेकोट सुरक्षेतून जावे लागते. प्रत्येक वेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर विशेष संरक्षण गट म्हणजेच एसपीजीचा कडक पहारा असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com