डॉ बिष्णू प्रसाद नंदा यांनी रेल्वे मंडळाचे महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारला.

डॉ बिष्णू प्रसाद नंदा यांनी रेल्वे मंडळाचे महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारला.

पत्र सूचना कार्यालय भारत सरकार रेल्वे मंत्रालय डॉ बिष्णू प्रसाद नंदा यांनी रेल्वे आरोग्य सेवा (डीजी आरएचएस) रेल्वे मंडळाचे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. रेल्वे मंडळाच्या आरोग्य विभागाच्या सर्वोच्च पदावर नंदा रुजू झाले आहेत. यापूर्वी, डॉ बी पी नंदा हे, दक्षिण रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक म्हणून काम पाहत होते. 1983 मध्ये यूपीएससीच्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत डॉ बी. पी. नंदा यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला होता व त्यांची निवड भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवांसाठी झाली होती. डॉ. बी पी नंदा 14 नोव्हेंबर 1984 रोजी दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर विभागीय रुग्णालयात भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवेत रूजू झाले. परीक्षाकाळ पूर्ण झाल्यानंतर, डॉ नंदा नागपूर विभागांतर्गत मध्य प्रदेशातील छिंदवाडा आरोग्य युनिटमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते; त्यानंतर त्यांची बदली रांचीच्या हटिया रेल्वे रूग्णालयात झाली, जिथे त्यांनी सात वर्षे सेवा केली. त्यानंतर त्यांची बदली भुवनेश्वर येथील मंचेश्वर रेल्वे रूग्णालयात झाली. डॉ नंदा यांनी 1994-97 दरम्यान मुंबई विद्यापीठ, मुंबई येथून ईएनटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले होते. नंतर अदरा विभागीय रेल्वे रुग्णालयात ईएनटी विशेषज्ञ म्हणून तैनात झाले जिथे त्यांनी 15 वर्षे काम केले. चक्रधरपूर विभागाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक म्हणून एसएजी स्तरावर पदोन्नतीनंतर झाल्यानंतर डॉ नंदा यांनी प्रशासकीय कारकीर्द सुरू केली. 2018 पर्यंत अदरा (पूर्व रेल्वे) आणि मद्रास (दक्षिण रेल्वे) मध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर अयानवरम येथील पेरामूर रेल्वे रुग्णालयाच्या अत्यंत प्रतिष्ठित, अशा सहा विभागीय रुग्णालयासह दक्षिणेकडील रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक या पदाचा कार्यभार यशस्वीपणे पार पाडला. दक्षिणेकडील रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत असताना डॉ नंदा यांनी क्षेत्रासाठी औषधे व शल्यक्रिया ई-प्रोक्यूरमेंट कार्यान्वित करण्यात मोलाची भूमिका बजावत होते. त्यांच्या सक्षम नेतृत्वात वैद्यकीय विभागाने ई-प्रोक्योरमेंट पूर्ण केले, तसेच सर्व विभागांना न्याय्य वितरण सुनिश्चित केले. वैद्यकीय क्षेत्रातील नवीनतम घडामोडींसह 'आयआरएचएस केडर'ला अद्यतनित करण्यासाठी शैक्षणिक क्रियाकलापांना वेग आला आहे. त्यांच्या कार्यकाळात विभागीय स्तरावर सीएमईचे दोन आणि अखिल भारतीय सीएमई कार्यक्रम घेण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com