देशातील चार राज्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम सुरू

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

देशातील चार राज्यांमध्ये आज कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली

नवी दिल्ली: देशातील चार राज्यांमध्ये आज कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली. या तालमीनंतर एक सविस्तर विश्‍लेषण अहवाल तयार केला जाणार असून तो पुढे राज्य सरकारच्या कृती पथकाकडे (टास्क फोर्स) सोपविण्यात येईल. या रिपोर्टचा आधार घेऊनच पुढे टास्क फोर्स मार्गदर्शक सूचनांमध्ये काही बदल करेन, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 देशामध्ये प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी आणि त्या अनुषंगाने नियोजन आखण्यासाठी लसीकरणाची ही रंगीत तालीम घेतली जात आहे. दरम्यान जानेवारी महिन्यामध्येच कोरोना लसीकरणाला सुरवात होण्याची शक्यता आहे.

पंजाब, आसाम, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ही तालीम सुरू झाली असून या माध्यमातून लाइव्ह डेटा संकलित करण्यात येणार असून तो को-विन या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येईल. पुढे त्याचा प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेदरम्यान केला जाणार आहे.

संबंधित बातम्या