Haryana: अवैध खाणकाम रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला

Haryana News: हरियाणातील मेवातमध्ये डीएसपीला डंपरने चिरडल्याची घटना समोर आली आहे.
Haryana
HaryanaTwitter /ANI

Haryana Police: हरियाणातील मेवातमध्ये डीएसपीला डंपरने चिरडल्याची घटना समोर आली आहे. डीएसपी सुरेंद्र सिंह अवैध खाणकाम रोखण्यासाठी पोहोचले होते, परंतु माफियाच्या लोकांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नूह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना अवैध खाणकामाची माहिती मिळाली होती आणि ते तपासासाठी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी यावेळी अवैध उत्खनन करत असलेला एक ट्रक त्यांच्यावर चढवण्यात आला. आरोपींचा (Accused) शोध सुरु आहे.

Haryana
Odisha: सामूहिक बलात्कारापासून वाचण्यासाठी मुलीने मारली शाळेच्या इमारतीवरुन उडी

दरम्यान, डीएसपी सुरेंद्र सिंह लवकरच निवृत्त होणार होते. सध्या मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. या घटनेत आणखी एका ट्रकचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस (Police) बंदोबस्त तैनात असून आजूबाजूच्या परिसरात चालकाचा शोध सुरु आहे.

Haryana
मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर आईने स्वतः उडी मारली; पहा व्हायरल व्हिडिओ

वृत्तानुसार, डीएसपींनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक त्यांच्यावर चढवला. मारेकरी लवकरच पकडले जातील आणि कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन हरियाणा (Haryana) पोलिसांनी ट्विट करुन दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com