दूधसागर पर्यटन हंगामाला थाटात प्रारंभ

दूधसागरला येणाऱ्या पर्यटकांचे भव्‍य स्‍वागत : मोलेत 20 जीपगाड्यांना प्रवेश
दूधसागर पर्यटन हंगामाला थाटात प्रारंभ
दूधसागर धबधबाDainik Gomantak

धारबांदोडा: कुळे येथील दूधसागर धबधबा(Dudhsagar Waterfall) पर्यटन हंगामाची (Tourism Season) औपचारिक प्रारंभ सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पर्यटकांच्या पहिल्या तुकडीचे गळ्‍यात पुष्‍पहार घालून स्‍वागत करण्यात आले. तसेच मोले वन्यजीव विभागाचे फाटक उघडून सुमारे वीस जीपगाड्यांना प्रवेश देण्यात आला.

दरम्‍यान, उद्यापासून पूर्ण क्षमतेत येथे पर्यटन हंगामाला सुरुवात होणार आहे. दूधसागर परिसरात प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने वन्यजीव विभागाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करून रस्त्याचे काम हातात घेण्यात आले होते. एका बिगरसरकारी संस्थेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सरकार पालन करणार असून लवकरच राष्ट्रीय वन्यजीव विभागाचा ना हरकत दाखल मिळवून या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्‍यात येईल, असेही मंत्री पाऊसकर म्‍हणाले.

दूधसागर धबधबा
गोव्यातील म्हादई, दूधसागर नदीवर येणार 10 नवे प्रकल्प

हा रस्ता झाल्यास जीपमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे असे सांगून दूधसागर नदीवर सुमारे 70 लाख रुपये खर्चून कालवे बांधण्यात येणार असल्याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. जीपमालकांनी ‘अतिथी देवो भव’ याप्रमाणे पर्यटकांचे स्वागत करावे, असे आवाहन धारबांदोडा जिल्हा पंचसदस्य सुधा गावकर यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच मनीष लांबोर, दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप मायरेकर, सचिव ब्रिजेश भगत, खजिनदार जानबा लांबोर, सदस्य ट्रिपोलो सौझा, नरेश शिगावकर, कमलेश म्हार्दोळकर, बॅनी आझावेदो, सुकुर मास्कारेन्हस, मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी सिद्धेश नाईक, सावर्डे भाजप मंडल अध्यक्ष विलास देसाई, पंचसदस्य नीलेश सातपालकर उपस्थित होते.

दूधसागर धबधबा
पाहा दूधसागर धबधब्याचे 'Sea of Milk' रूप

"दूधसागर धबधबा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. येथे देशी व विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. त्यांचे दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून भव्‍य स्वागत केले जाते. तसेच पर्यटकांना चांगली सेवा देण्याबरोबरच त्‍यांना प्रामाणिक सेवा देण्याचे काम जीपमालक करीत आहेत. या सर्वांच्‍या सहकार्यामुळेच येथील पर्यटन बहरू लागले आहे."

- दीपक प्रभू पाऊसकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com