प्रजासत्ताक दिनावर कोरोनाचे सावट

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कमी अंतराचे संचलन असेल. मागील वर्षीच्या तुलनेत प्रेक्षकांची उपस्थितीही कमी असेल. 

नवी दिल्ली:  दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दिमाखात पार पडतो. यंदा मात्र, कोरोनामुळे यात अनेक बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कमी अंतराचे संचलन असेल. मागील वर्षीच्या तुलनेत प्रेक्षकांची उपस्थितीही कमी असेल. 

दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी देशाच्या लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन यंदाही होईल. मात्र, कोरोनामुळे प्रत्येक कार्यक्रमाची वेळ, आवाका मर्यादित असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचे सर्व नियम ध्यानात ठेवून प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी केली जात आहे.  यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

केवळ २५ हजार जणांची उपस्थिती
दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याला एक लाख लोक उपस्थित असतात. यंदा कोरोनामुळे केवळ २५ हजार जणांनाच हा सोहळा अनुभवता येईल. त्याचप्रमाणे, १५ वर्षांखालील मुलांना परवानगी नसेल. संचलनात सहभागी होणाऱ्या लष्करी तुकड्यांतही १४४ ऐवजी ९६ जण असतील. हवाई दलाच्या दोन तुकड्यांची संचलनासाठी निवड झाली आहे.

संबंधित बातम्या