दररोज रणनिती आखणार: ‘चलो दिल्ली’

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

‘चलो दिल्ली’ च्या आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमले असून तेथेच आंदोलन केले जात आहे. शेतकरी संघटना, दिल्ली पोलिस आणि सरकार यांच्यात सकारात्मक तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सीमा न सोडण्याचा निर्धार केला आहे.

नवी दिल्ली : ‘चलो दिल्ली’ च्या आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमले असून तेथेच आंदोलन केले जात आहे. शेतकरी संघटना, दिल्ली पोलिस आणि सरकार यांच्यात सकारात्मक तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सीमा न सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता दररोज सकाळी संघटनांच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यात त्या दिवसाची रणनिती आखली जाणार आहे.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तैनात असलेल्या शेकडो पोलिस व निमलष्करी जवानांसाठीही आंदोलकांनी या लंगरमध्ये भोजनाची व्यवस्था केली. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे अमृतसरचे खासदार गुरजीतसिंग औजला व खासदार रवनीतसिंग बिट्टू व दिल्लीतील काही नेते आज टीकरी येथे पोहोचले. दुपारी शेतकरी संघटनांची बैठक झाल्यावर भारतीय शेतकरी संघटनेचे हरिंदरसिंग म्हणाले, की येथून कोठेही हटणार नाही असा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. आम्ही कोठेही जाणार नाही व येथेच राहून आंदोलन जारी ठेवू. दररोज सकाळी ११ वाजता संघटनांच्या नेत्यांच्या बैठकीत त्या त्या दिवसाची रणनीती आखण्यात येईल.  राष्ट्रीय महामार्ग ४४ वर गाझीपूर येथे जमलेल्या सुमारे ४०० ते ५०० शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी दिल्लीत जाण्याची परवानगी दिली. मात्र तुम्हाला ट्रॅक्‍टर घेऊन प्रवेश मिळणार नाही, अशीही पोलिसांनी अट घातली. ती अट फेटाळून तेथेच जोरदार प्रदर्शनास सुरवात केली.

विनामूल्य जेवण, चहापान
हरियाना व उत्तर प्रदेशातील अनेक ढाबे व हॉटेलांनी दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांसाठी विनामूल्य जेवण व चहापाण्याची व्यवस्था केली आहे. हरियानातील मुर्थल येथील प्रसिद्ध अमरीक सुखदेव ढाब्यानेही शेतकऱ्यांसाठी दरवाजे खुले केले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र समितीने या ढाब्याच्या कामाला आज ‘लाल सलामी’ दिली. 

तोमर, खट्टर यांचे आवाहन
शेतकऱ्यांशी चर्चेसाठी सरकार कधीही तयार असून चर्चेतून मार्ग काढावा व आंदोलन समाप्त करावे असे आवाहन कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पुन्हा केले. मुख्यमंत्री खट्टर यांनी आंदोलनातील एका व्हिडीओचे उदाहरण दिले व ठोस पुरावे मिळाल्यावर याबद्दल विस्ताराने बोलू असे सांगितले.

आणखी वाचा:

अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे हा अपराध नव्हे तर कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोट्या गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचे मजबूत इरादे बदलू शकत नाही. शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द होईपर्यंत ही लढाई चालू राहील. शेतकऱ्यांबद्दल जय किसान ही आमची भावना कायम राहील.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते.

 

संबंधित बातम्या