प्रेमप्रकरणामुळे दलित तरुणाला करावं लागलं किळसवाणं कृत्य

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

प्रेमप्रकरणामुळे दलित तरुणाला पंचायतकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती.

गया: एका दलित तरुणाला जमिनीवरील थुंकी चाटायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता त्याला जबरदस्तीने मूत्रही पाजण्यात आले. बिहारमधील बोधगया येथे हा घृणास्पद प्रकार घडला आहे. प्रेमप्रकरणामुळे दलित तरुणाला पंचायतकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंचायती दरम्यान अनेक जण थुंकत असून दलित व्यक्तीला ते चाटण्यास भाग पाडलं जात आहे. (Due to love affair Dalit youth had to commit a disgusting act)

देशातील पहिलीच घटना; कोरोना लस चोरीला

थुंकी चाटल्यानंतर या दलित तरुणाला जबरदस्तीने मूत्र पाजण्यात आलं. गयामधील वझीरगंज परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दलित तरणाचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर पंचायतीकडून ही शिक्षा सुनावण्यात आली. पिडीत व्यक्ती महिलेसोबत पळून गेला होता. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयानी त्यांना पकडून पंचायतीसमोर हजर केलं होतं. या पिडीत तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गया पोलिसांनी याची दखल घेतली. गयाचे एसएसपी आदित्य कुमार यांनी या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं गया पोलिसांनी सांगितलं आहे.

 

संबंधित बातम्या