प्रेम विवाहाला आई वडिलांच्या विरोधामुळे प्रियकराची दुबईत तर प्रियेसीची भारतात आत्महत्या 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

 प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची संकल्पना वेगवेगळी असते. रिलेशनशीपमध्ये  असणारा जोडीदार एका शहरातून दुसऱ्या शहरात गेला तरी त्याच्याबद्दल आसणारी आपुलकी आजिबात कमी होत नाही.

 हैद्राबाद: प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची संकल्पना वेगवेगळी असते. रिलेशनशीपमध्ये  असणारा जोडीदार एका शहरातून दुसऱ्या शहरात गेला तरी त्याच्याबद्दल आसणारी आपुलकी आजिबात कमी होत नाही. प्रेमाचे बंध इतके मजबूत असतात की एखादा जोडीदार साता समुद्रापार गेला तरी त्यांचे प्रेमाचे नाते कायम टिकून राहते. मात्र प्रेमात असणाऱ्या जोडप्यांच्या प्रेमविवाहाला खूपदा कुटुबांतून तसेच नातलगांकडून विरोध होत आसल्यामुळे या प्रेमीयुगुलाला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते.

 असचं  एक आत्महत्येच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यात   प्रियकराने दुबईत तर प्रियेसीने भारतात आत्महत्या केली आहे. आई वडिलांनी या प्रेमविवाहाला विरोध केल्यामुळे मुलीने तेलंगणामधील आपल्या घरी आत्महत्या केली. तर मुलाने आपली जीवनयात्रा दुबईत संपवली. राकेश आणि मनिषा यांना विवाहबध्द व्हायचे होते. मात्र प्रियसीच्या मृत्यूची बातमी राकेशला समजल्यानंतर राकेशने दुबईमध्ये आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी राकेशने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये प्रियसीच्या आठवणीत रडत असताना दिसतो. तसेच तो या व्हिडीओत म्हणत आहे, ‘मनिषा शिवाय मी माझ्य़ा आयुष्याची कल्पना करु शकत नाही’. नोकरीच्या निमित्ताने राकेश काही दिवसांपूर्वी दुबईत गेला होता. आई वडिलांना या विवाहाला मान्यता द्यावी यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले. मात्र पालकांनी कोणत्याही परस्थितीत मान्यता न दिल्यामुळे मनिषाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली तर राकेशने दुबईत आत्महत्या केली.

संबंधित बातम्या