ट्विट मधल्या एका चुकीमुळे प्रियांका गांधी होत आहेत ट्रोल

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

'आम्ही तरुणांना राजकारणात संधी देत असल्याचे सांगताना'  प्रियांका गांधी यांनी एक ट्विट केले होते.

केरळमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या सरचिटणीस  प्रियांका गांधी वाड्रा यांना एका ट्विट मुळे  ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. आम्ही तरुणांना राजकारणात येण्यासाठी संधी देत असल्याचे सांगताना त्यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विट वरून प्रियांका गांधी वाड्रा याना मोठ्या प्रमाणात ट्रोल कऱण्यात येत आहे. नेटकऱ्यानी प्रियांका याना निवडणूक नियमांचा विसर पडला असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली.  

'गोत्र' संगितल्याच्या मुद्द्यावरून ओवैसींनी ममता बॅनर्जींवर साधला...

केरळ मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील तिरंगी लढत केरळ मध्ये पाहायला मिळते आहे. त्यातच प्रियांका गांधी यांनी एक ट्विट केले होते, ज्या ट्विट मध्ये प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी लिहिले होते की,'आम्हाला अभिमान आहे की केरळमधील आमचे 50 टक्के उमेदवार वय 20 ते 40 वर्ष वयोगटातील आहेत. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या ज्ञान आणि अनुभवासोबतच त्यांनी एक प्रचंड शक्ती सुद्धा निर्माण केली आहे. मला आशा आहे की केरळमधील (kerala) जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना देण्यात येईल आणि  यूडीएफचे हे स्वप्न साकार होईल.' या ट्विट वर प्रियांका गांधी यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली (Troll) गेली. कारण, प्रियांका यांनी उमेदवारी 20 ते 40 वयोगटातील तरुणांना दिल्याचा उल्लेख केला. मात्र, विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावे लागते. 

लडाखचे भाजप खासदार जामयांग सरिंग नामग्याल यांनी यावर प्रत्युत्तर देणारे ट्विट केले. यामध्ये त्यांनी लिहिले की "भारतात निवडणुका (Election) लढण्यासाठी किमान वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. आता जर आपले उमेदवार 25 वर्षांपेक्षा 20 वर्षांपेक्षा कमी असतील तर काय होईल? आपल्याला सक्रिय राजकारणाची मूलभूत माहिती आणि निवडणुकांचे नियम माहित नसल्यास शांत बसणे हा एक चांगला पर्याय आहे." दरम्यान भारतीय जनता पक्षाचे वेगवगळ्या राज्यातील नेते, कार्यकर्ते आणि इतर अनेक नेटकऱ्यांनी  यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

 

संबंधित बातम्या