दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसला भीषण आग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

शॉर्ट सर्किटमुळे आज रविवारी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या डब्यांना अचानक भीषण आग लागली.

देहरादून: शॉर्ट सर्किटमुळे आज रविवारी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या डब्यांना अचानक भीषण आग लागली. ही घटना कंसोर जवळ घडली.अशी माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली.

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रेल्वेच्या सी 4 डब्यात आग लागल्यामुळे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली. ही आग आटोक्यात आणण्यात आली असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप असल्याचे कुमार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या