दुष्यंत दवेंनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा     

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

सर्वोच्च न्यायालयातील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष व ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष व ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. दुष्यंत दवे यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण अजून स्पष्ट केलेले नाही. मात्र एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी आज सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

काही दिवसांपूर्वीच दुष्यंत दवे यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांचा विषय  हाताळताना स्वतःला एका कोपऱ्यात ठेवले असल्याचे म्हटले होते. दुष्यंत दवे हे आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांना सहाय्य्य करत असलेल्या तीन वकिलांपैकी एक आहेत. तसेच या मुलाखतीत दुष्यंत दवे यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांसंदर्भात बोलताना, सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले असल्याचा गंभीर आरोप केला होता. 

'आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय घरवापसी नाही' शेतकरी नेते राकेश...

त्यानंतर आज ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र यामागचे कोणतेही कारण त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही.      

संबंधित बातम्या