Earthquake: उत्तराखंडसह अंदमान निकोबारातही भूकंपाचे धक्के

भूकंपाची (Earthquake) तीव्रता 4.6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली असून या भूकंपाचा परिणाम शेजारच्या राज्यांवरही झाला आहे.
Earthquake: उत्तराखंडसह अंदमान निकोबारातही भूकंपाचे धक्के
Earthquake in Uttarakhand and Andaman NikobarDainik Gomantak

उत्तराखंडच्या (Uttarakhand) जोशीमठमध्ये भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली असून या भूकंपाचा परिणाम शेजारच्या राज्यांवरही झाला आहे.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप सकाळी 5.58 वाजता झाला असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही.(Earthquake in Uttarakhand and Andaman Nikobar)

तर दुसरीकडे अंदमान आणि निकोबारमध्येही (Andaman & Nikobar) आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 8:50 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. मात्र, कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू डिगलीपूरच्या उत्तरेस 137 किमी होता.यापूर्वी गुरुवारी हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के चंब्या व्यतिरिक्त कांगडा जिल्ह्याच्या अनेक भागात जाणवले होते भूकंपाचा केंद्रबिंदू चंबा जिल्ह्यात पाच किलोमीटर भूमिगत होता आणि त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली होती.

Earthquake in Uttarakhand and Andaman Nikobar
शिक्षकच बनला भक्षक; 9 वर्षांच्या मुलीवर VIDEO दाखवून केला लैंगिक अत्याचार

भूकंपाचे धक्के जाणताच अनेक लोक घराबाहेर पडले. भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. हिमाचल देखील भारतीय भूकंप प्लेटमध्ये येते. त्यामुळे भूकंपाच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत संवेदनशील मानले जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com