भूकंपामुळे हादरले दिल्लीकर; त्यात आज सकाळी धुक्याने केला कहर

An earthquake of magnitude 6.3 on the Richter scale hit Tajikistan yesterday And today fog this morning in delhi
An earthquake of magnitude 6.3 on the Richter scale hit Tajikistan yesterday And today fog this morning in delhi

नवी दिल्ली: काल शुक्रवारी रात्री ताजिकिस्तानमध्ये भूकंप झाला. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे लिव्र धक्के जाणवले. भूकंपविज्ञान विभागाने पूर्वी चुकून असे कळवले होते की भूकंपाचे केंद्रबिंदू पंजाबच्या अमृतसर येथे 19  किमीच्या खोलीवर होते.  नंतर त्यांनी सुधारित विधान जाहीरी केले आणि भूकंप प्रत्यक्षात ताजिकिस्तानला झाला असे सांगितले.  विभाग म्हणाले की ही चूक सॉफ्टवेअरमुळे झाली आहे.

नॅशनल भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस) म्हटले आहे की भूकंपाचे प्रमाण 6.3 रेस्टर स्केल आहे. रात्री 10.34 वाजता हा भूकंप झाला. यात जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याची कोणतीही खबर नाही. भूकंपाच्या धक्क्याने राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी दहशत पसरली. गाझियाबादच्या वैशाली, वसुंधरा आणि इतर भागात भूकंप झाल्यामुळे लोक घराबाहेर पडले. जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आद्याप वृत्त नाही.

राहुल गांधी-ओमर अब्दुल्ला यांची भूकंपाबाबत प्रतिक्रिया

जेव्हा भूकंप झाला तेव्हा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी शिकागो विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी डिजिटल मार्गाने संवाद साधत होते, जेव्हा ते म्हणाले की संपूर्ण खोली हादरली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, "2005 च्या भूकंपानंतर श्रीनगरमध्ये कोणताही धक्का एवढआ तिव्र नव्हता या भूकंपाने मला घराबाहेर पडण्यास भाग पाडले. मी ब्लँकेट घेऊन बाहेर पळत गेलो. मला फोन सोबत घेण्याचेदेखील भान राहिले नाही, म्हणून जेव्हा जमीन हादरत होती तेव्हा मला 'भूकंप' असे ट्विट करता आले नाही. ''

ताजिकिस्तान भूकंपाचे केंद्रबिंदू आहे

भूकंपाचे केंद्रस्थानी ताजिकिस्तान होते. हे केंद्र अमृतसर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्ही त्या माहितीत सुधारणआ केली आहे. एनसीएसने सांगितले की भूकंपात दोन हादरे बसले होते, ताजिकिस्तानमध्ये 10.31 वाजता आणि अमृतसरमध्ये 10.34 वाजता, असे एनसीएसचे प्रमुख संचालक जेएल गौतम यांनी सांगितले. शनिवारी सकाळी कोठूनही कुठलीही अनुचित घटनेची नोंद झालेली नाही. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.

शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआरमधील कोट्यावधी लोकांना घाबरून सोडले आहे. आणि आज शनिवारी पहाटे थंडी वाढल्याने धुक्याचाही त्रास होत  आहे. एनसीआरमध्ये तसेच दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, सोनीपत, रेवाडी यासह एनसीआरमधील डझन शहरांमध्ये धुके पसरली आहेत. कार्यालयील आणि इतर कामासाठी जाणाऱ्या लोकांना रस्त्यावर धुके असल्यामुळे दिवे लावून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी काल शुक्रवारी सकाळी धुक्याने लोकांचे हाल केले होते. त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवस धुके आणखीनच वाढणार असल्येचे संकेत दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com