गुजरामधील भरूच येथे बसले भूकंपाचे धक्के

गुजरामधील भरूच येथे बसले भूकंपाचे  धक्के
earthquake

भरूच-  गुजरातमधील भरूच येथे आज दुपारी भुकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाच्या अनुषंगाने संवेदनशील असलेल्या भागात हा धक्का बसलेला आहे. 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा धक्का असून दुपारी 3 वाजून 39 मिनीटांनी हा धक्का जाणवल्याचे तेथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले आहे.    

याआधी 2012 मध्ये मध्यरात्री गुजरातमधील विविध भागात भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपामुळे कच्छ, अहमदाबाद, राजकोट, भावनगर आणि जामनगरसह अनेक परिसर हादरले होते. त्यामुळे येथील नागरिकामध्ये रात्रभर घबराट होती.

कच्छमध्ये २६ जानेवारी २००१ रोजी भूकंपाने झालेल्या नुकसानामुळे तेथे भूकंपाला कायमच गांभीर्याने घेतले जाते. तेथे त्यावेळी ७.६ ते ८.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात सुमारे २० हजार नागरिकांना जीव गमवावे लागले होते.  हजारो इमारतींचे नुकसान झाले होते. तर काही इमारती अक्षरश: जमीनीत गाडल्या गेल्या होत्या. तर अनेकांना बेघर व्हावे लागले होते.


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com