भारतातील तीन राज्यात भूकंपाचे धक्के
Earthquake

भारतातील तीन राज्यात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली :  भारतातील तीन राज्यात शुक्रवारी भूकंपाचे धक्के ( Earthquake) जाणवले आहे. या तिन्ही राज्यात वेगवेगळ्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. रिश्टर स्केलवर  (Richter scale) भूकंपाची  (Earthquake) तीव्रता  4.1 आणि 2.6 एवढी नोंद करण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के अनुक्रमे सोनितपुर (आसाम),  चंदेल (मणीपुर), पश्चिम खासी हिल्स (मेघालय) येथे जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजिनने (National Center for Seismology) भूकंपाच्या तीव्रतेची नोंद केली आहे.  ( Earthquake shakes three states in India )

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजिनुसार भुकंपाचे धक्के पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पश्चिम खासी हिल्स (मेघालय) येथे जाणवले आहेत. येथे भूकंपाची सर्वात कमी तीव्रता 2.6 इतकी मोजली गेली आहे. सोनितपुर (आसाम) येथे सर्वात जास्त तीव्रता 2.40  इतकी मोजली गेली आहे. त्याचवेळी चंदेल (मणीपुर) येथे रात्रीच्या सुमारास 1.06 वाजता भूकंपाचे दकके जाणवले आहे. येथील तीव्रता 3.0 एवढी नोंद झाली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com