Breaking News : उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 5 एप्रिल 2021

बिहार, पश्चिम बंगालसह देशातील विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

बिहार, पश्चिम बंगालसह देशातील विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सिक्किम-नेपाळ सीमेजवळ या भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्यानुसार रात्री 8.49 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता 5.4 होती. त्याचबरोबर झारखंड, आसाममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा हादरा जाणवताच लोक आपापल्या घरातून पडत रस्त्यावर आल्याचे यावेळी पाहायला मिळाले. 

डीआरडीओने भारतीय नौदलांच्या जहाजांसाठी विकसित केले खास चिलखत 

भूकंपाचे हादरे जाणवल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर भीती जाणवली. मात्र, अद्याप कोणीही जखमी झाल्याची नोंद मिळालेली नाही.

संबंधित बातम्या