सत्येंद्र जैन यांच्या जवळच्या दोन साथीदारांना ईडीने केली अटक, हे आहेत आरोप

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या आणखी दोन जवळच्या साथीदारांना अटकेत घेतले आहे.
Satyendra Jain
Satyendra JainDainik Gomantak

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या आणखी दोन जवळच्या साथीदारांना अटकेत घेतले आहे. अंकुश जैन आणि वैभव जैन त्यांची नावे आहेत. तसेच सीबीआयने सत्येंद्र जैन यांच्याविरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये या दोघांचीही नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत. ईडी या दोघांना विशेष न्यायालयात हजर करून चौकशीसाठी कोठडीत ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Satyendra Jain Money Laundering Case Update)

Satyendra Jain
स्टेनोग्राफर, वरिष्ठ सहाय्यक यासह अनेक पदांकरीता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यापासून या दोघांची सतत चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या तपासात हे लोक सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्येंद्र जैन यांनी केलेल्या मनी लाँड्रिंगमध्ये या लोकांचा महत्त्वाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच या प्रकरणी कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या भूमिकेतही या लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असेही सांगण्यात आले आहे.

ईडीला आणखी खुलासे अपेक्षित आहेत

यासोबतच शेल कंपन्यांच्या पैशातून दिल्लीत खरेदी केलेल्या मालमत्तेच्या प्रकरणातही या लोकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले आहे. ईडीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी 6 जून रोजी करण्यात आलेल्या छाप्यांमध्ये या लोकांकडून रोख रक्कमही देखील जप्त करण्यात आली होती.

ईडीला या दोघांकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोलकाताच्या शेल कंपन्यांना दिलेली रोकड कोणत्या स्वरूपात दिली आणि सत्येंद्र जैन यांच्याशी त्या रोखीचा काय संबंध होता, आणि हे दोन्ही आरोपी सत्येंद्र जैन यांच्या जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Satyendra Jain
उदयपूर हत्याकांडाचा पर्यटनावर परिणाम, लाखो रुपयांचे बुकिंग पर्यटकांनी केले रद्द

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करून रिमांड घेण्यात येणार असून त्यांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीदरम्यान या प्रकरणातील अन्य महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात, असा विश्वास ईडीला आहे. या प्रकरणाची पाहणी अध्याप सुरूच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com