दुबेच्या मालमत्तेची ‘ईडी’कडून चौकशी

PTI
रविवार, 12 जुलै 2020

देशात व परदेशातील संपत्तीची माहिती मागविली

नवी दिल्ली

गुंड विकास दुबे, त्याचे कुटुंब आणि त्याचे निकटचे साथीदार यांच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालय (ईडी) मागविली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दुबेच्या साथीदाराने संयुक्त अरब अमिराती व थायलंडमध्ये पेंटहाऊसची खरेदी केलेली होती. गेल्या तीन वर्षांत दुबेने १४ देशांना भेट दिली होती. त्याने लखनौ येथे नुकताच एक बंगला खरेदी केला होता त्याची किंमत सुमारे २० कोटींपेक्षा असल्याचे सांगण्यात येते. काही मोठ्या उद्योजकांसाठी दुबे काम करीत असल्याच्या संशयावरून
उत्तर प्रदेशमधील त्याच्या सर्व घरांची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनाही दिले फ्लॅट
विकास दुबेला चकमकीत मारण्यापूर्वी उज्जैनहून कानपूरला आणत असताना विशेष कृती दलाने (एटीएफ) केलेल्या चौकशीत अनेक गोष्टींचे खुलासे त्‍याने केले होते. दुबेने त्याच्या गृहप्रकल्पात अनेक पोलिसांना कमी किमतीत प्लॅट दिले होते. काही पोलिस कर्मचाऱ्यांना दर महिन्याला हप्ता पोचवत होता, असेही त्याने सांगितले. आता या पोलिसांची माहिती ‘एटीएफ’ गोळा करीत आहे.

दुबेचे बेनामी व्यवहार
- एकट्या उत्तर प्रदेशमध्ये ११ घरे व १६ प्लॅट
- लखनौतील आर्यनगरमध्ये २३ कोटींचा बंगला, आठ फ्लॅटची एक इमारत
- ब्रह्मनगरमध्ये सहा घरे
- परदेशांत अनेक मालमत्ता
- दुबेच्या साथीदाराने यूएई व थायलंडमध्ये खरेदी केलेल्या पेंटहाऊसची किंमत सुमारे ३० कोटी रुपये

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या