ईडीकडून माजी गृहमंत्र्यांच्या पुत्राची चौकशी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

सॅंडलवुड ड्रग्जप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केरळचे माजी गृहमंत्री कोडियरी बाळकृष्णन यांचा मुलगा बिनेश कोडियरी याला आज अटक केली.

बंगळूर : सॅंडलवुड ड्रग्जप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केरळचे माजी गृहमंत्री कोडियरी बाळकृष्णन यांचा मुलगा बिनेश कोडियरी याला आज अटक केली.
कॉटन पेठेत आलेल्या ड्रग्ज नेटवर्क प्रकरणातील मुख्य आरोपी अनूप याच्याशी बिनेश याचा संबंध आहे. कम्मनहळ्ळी येथे एक रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी बिनेश याने ड्रग्ज विक्रेता अनूप याला ५० लाख रुपयाची मदत दिली होती.

या माहितीच्या आधारे ईडीने बिनेश याला नोटीस बजावली होती. ६ ऑक्‍टोबरला बिनेशची ६ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने एका मित्रामार्फत अनूपला आर्थिक मदत केल्याचे कबूल केले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी बिनेशला संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. 

आणखी काही कलाकारांची चौकशी
सॅंडलवूड अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि संजना गलराणी या आधीपासूनच ड्रग्ज पदार्थांच्या वापराच्या आरोपाखाली परप्पन अग्रहर तुरुंगात आहेत. या व्यतिरिक्त, सीसीबी पोलिसांनी अभिनेता दिगंत आणि इंड्रिता राय आणि कथाकार अनुश्री यांच्यासह काही दूरदर्शन कलाकारांची चौकशी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या