National Herald Case: राहुल गांधींना ईडीने पुन्हा बोलावले

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले.

Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे साडेआठ तास एजन्सीने त्यांची चौकशी केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) सकाळी 11.10 वाजता एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि सुमारे 20 मिनिटे त्यांची उपस्थिती नोंदवल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, ईडीने राहुल गांधींना उद्या म्हणजेच मंगळवारी पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे.


Rahul Gandhi
National Herald Case: नेमकं काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण, वाचा सविस्तर

दरम्यान, पहिल्या फेरीच्या चौकशीनंतर राहुल गांधींना दुपारी 2.10 च्या सुमारास ईडीच्या मुख्यालयातून जेवणासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुपारच्या जेवणानंतर ते दुपारी साडेतीन वाजता पुन्हा ईडीसमोर हजर झाले. पहिल्या फेरीत राहुल गांधींची सुमारे तीन तास ईडीने चौकशी केली, तर दुसऱ्या फेरीत साडेपाच तास चर्चा झाली. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रतिबंधक कायद्याच्या कलम 50 अंतर्गत राहुल गांधी यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात दिल्याचे समजते.

काँग्रेस नेत्यांचा निषेध

सकाळी राहुल गांधी काँग्रेस (Congress) मुख्यालयातून ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा, काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी राहुल गांधींना पाठिंबा दर्शवला. राहुल गांधींचा ताफा ईडीच्या मुख्यालयात पोहोचला तेव्हा प्रियांका गांधीही त्यांच्या शेजारी कारमध्ये बसल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com