कौन है ये 'खूबसूरत हसीना'? जिच्या घरातून ED ला मिळाली 20 कोटींची रोकड

West Bengal News: अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जाते.
Arpita Mukherjee
Arpita MukherjeeDainik Gomantak

Arpita Mukherjee: अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जाते. ती पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अर्पिता मुखर्जीने बंगाली चित्रपट सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांच्या प्रमुख भूमिकांसह काही चित्रपटांमध्ये साइड रोल देखील केला आहे. त्याचबरोबर तिने ओडिशा चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्पिता पार्थ चॅटर्जीसोबत अनेकवेळा राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती पार्थ चॅटर्जीसोबत प्रचार करतानाही दिसली होती. दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीच्या समारंभात दोघे एकत्र आले होते. चॅटर्जी ही समिती चालवतात, तर अर्पिता अनेकवेळा या पूजेचा चेहरा बनली आहे.

Arpita Mukherjee
ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्र्याला EDकडून अटक; शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी कारवाई

रिपोर्ट्सनुसार, अर्पिता गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण कोलकातामध्ये (Kolkata) एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. ईडीने तिच्या घरावर छापा टाकला, जिथे ईडीच्या पथकाने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. "तपासादरम्यान, ईडीने (ED) पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) हिच्या निवासी परिसरातून सुमारे 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली," ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com