
ED Raid in Kolkata: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुन्हा एकदा कारवाई केली आहे. आज (शनिवार) ईडीने कोलकाता शहरातील अनेक भागात छापे टाकले. ईडीच्या पथकाने टिममध्ये विभाजित होवून संपुर्ण नियोजन केले. त्यानंतर त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केली. या कारवाईत ईडीने 7 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे.
7 कोटींहून अधिक रोकड जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, गार्डन रीच भागातील आमिर खान नावाच्या ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी ईडी अधिकाऱ्यांना कॉटखाली प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये गुंडाळलेले 500 आणि 200 रुपयांचे अनेक बंडल सापडले आहेत.
मोबाइल गेमिंग अॅपसह फसवणुकीशी संबंधित प्रकरणाची चौकशी
मोबाईल गेमिंग अॅपद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने कोलकाता येथे 6 ठिकाणी छापे टाकून 7 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. ईडीने ज्या ठिकाणी छापे टाकले त्यात न्यू टाऊन, एकबेलर, पार्क स्ट्रीट आणि गार्डन रीचचा समावेश आहे.
मंत्री मलय घटक यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले
दरम्यान, कोळसा तस्करीच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी अलीकडेच सीबीआयने पश्चिम बंगालचे कायदामंत्री मलय घटक यांच्या कोलकाता आणि आसनसोल येथील अनेक निवासस्थानांवर छापे टाकून झडती घेतली होती. त्याचबरोबर कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने घटक यांना अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.