तबलिगीप्रकरणी ईडीचे छापे

पीटीआय
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

दिल्ली, मुंबई, हैदराबादसह देशभरात २० ठिकाणी कारवाई

नवी दिल्ली/ मुंबई: तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्ली आणि मुंबई, हैदराबादसह वीस ठिकाणी छापे घातले.

‘ईडी’च्या पथकाने दिल्लीत सात ठिकाणी तर मुंबईत अंधेरीसह चार ठिकाणी, अंकलेश्‍वर येथे एक आणि कोची येथे तीन ठिकाणी छापे घातले आहे. छाप्यादरम्यान तबलिगी जमातीशी निगडीत कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले.

‘ईडी’च्या पथकाने दिल्लीच्या जाकिरनगर येथेही छापा घातला आहे. या ठिकाणी मौलाना साद यांचे निवासस्थान आहे. तबलिगी जमातीचे कोरोना कनेक्शन समोर आल्यानंतर मौलाना साद यांच्याविरुद्ध पोलिसांनी चौकशीचा फास आवळला. एप्रिलमध्ये ईडीने मौलाना साद यांच्यासह पाच जणांवर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

ईडीची मुंबईत शोधमोहीम
तबलिगी जमातप्रकरणी सक्तवसुली ‘ईडी’ मुंबईत अंधेरीसह चार ठिकाणी शोधमोहीम राबवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटात दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमानंतर गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली, मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले होते. कार्यक्रमात राहण्या-खाण्याची सोय करण्यासाठी निधी कुठून आला, त्यांचे प्रायोजक कोण होते वा सहभागींच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला, मरकज सोडल्यानंतर अनेक लोक देशातील इतर ठिकाणीही गेले. त्यांचा बस, हवाई वाहतूक, टॅक्‍सीचा खर्च कोणी केला, याबाबत ईडी तपास करत आहे. 

संबंधित बातम्या