अनेक वर्ष राहील कोरोना लसीचा प्रभाव; बूस्टर डोसने वाढवता येतील अँटीबॉडी

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

संसर्ग टाळण्यासाठी एका वर्षा नंतर बूस्टर डोसची (Booster Dose) सुद्धा आवश्यकता भासू शकते.

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Covid-19 Second Wave) आणि लसीकरणासोबतच  विषयावर चर्चा सुरु आहे, तो विषय म्हणजे लसीचा प्रभाव किती काळ टिकेल? लसीच्या मूल्यांकनात सहभागी असलेल्या वैज्ञानिकांचा (Scientist) असा दावा आहे की लसीकरणानंतर अनेक वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग टाळता येतो, परंतु संसर्ग टाळण्यासाठी एका वर्षा नंतर बूस्टर डोसची (Booster Dose) सुद्धा आवश्यकता भासू शकते. (The effects of the corona vaccine will last for many years; Antibodies can be increased by booster dose)

नेचरमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, शास्त्रज्ञांचा एक गट सात कोरोना  लसींच्या क्लिनिकल चाचण्यांच्या तपशिलांचा अभ्यास करीत आहेत. लसींमुळे निर्माण होणार्‍या प्रतिकारशक्तीच्या दूरगामी परिणामांचा अभ्यास करणे हे यामागील उद्दीष्ट असणार आहे.

संशोधनातील चार निष्कर्षः
1- लसीकरणानंतर एक वर्षानंतर न्यूट्रीलाइजिंग अँटीबॉडी कमी होण्यास सुरवात होईल, त्यासाठी लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक असणार आहे जेणेकरुन न्यूट्रीलाइजिंग अँटीबॉडी पुन्हा वाढू शकतील आणि संसर्ग टळू शकेल.  

2- बूस्टर डोस घेतला नाही तरी देखील लसीकरण केल्यामुळे बरेच वर्ष कोरोनाचा तीव्र संसर्ग रोखला जाईल. म्हणजेच एकदा ज्यांना लसी दिली गेली त्यांना संसर्ग झाला तरी तो सौम्य होईल.

3- एखाद्या व्यक्तीला लस दिल्यानंतर, जर त्याच्या शरीरात न्यूट्रीलाइजिंग अँटीबॉडी कमी असल्या तरीही तो व्यक्ती कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सक्षम असेल. 

4- जर लसीची कार्यक्षमता 50 टक्के असेल, तर ती लागू केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कोरोना संसर्गाने बरे झालेल्या व्यक्तीपेक्षा 80 टक्के कमी अँटीबॉडी तयार होतात. तरीही त्या लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो.

फायझर-आणि मॉडर्नाची लस जास्त अँटीबॉडी बनवते 
मोडर्ना (Moderna vaccine)लस उत्पादक, अँटीबॉडी संशोधनाचे सह-लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीचे मायक्रोबायोलॉजिस्ट जेम्स ट्राइकस म्हणाले, फायझर, मोडर्नाच्या एमआरएन लसींमध्ये जास्त अँटीबॉडी तयार होतात, तर अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस कमी प्रमाणात अँटीबॉडी तयार करते. परंतु एका वर्षा नंतर सर्वांमध्येच अँटीबॉडी कमी होतील तेव्हा बूस्टर डॉस घेऊन त्या वाढवाव्या लागू शकतात. 

ऑगस्ट महिन्यापासून देशात सरु होणार स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन

डेनियल अल्टमैन यांचे संशोधन देखील महत्वाचे 
इम्पीरियल कॉलेज लंडनचे इम्यूनोलॉजिस्ट आणि या महत्त्वपूर्ण संशोधनाचे लेखक डॅनियल ऑल्टमॅन म्हणाले की कोरोना लसीकरण आणि शरीराच्या प्रतिकारशक्तीसंबंधी भविष्यातील रणनीती तयार करण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जेम्स ट्राइकस म्हणतात की क्लिनिकल ट्रायल डेटाच्या आधारे लसीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे संशोधकांना अवघड नाही. तसेच, यावर अधिक सखोल डेटा संकलित करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लक्षण नसलेल्या मात्र संक्रमित झालेल्या लोकांमध्ये कमी अँटीबॉडी 
जपानमधील योकोहामा सिटी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की, कोरोना आजार असलेल्या लोकांमध्ये एक वर्षानंतर पुरेशा अँटीबॉडीज आढळू शकतात. परंतु ज्या लोकांना संसर्ग होऊन सुद्धा लक्षणे दिसत नाहीत त्यांच्यामध्ये कमी अँटीबॉडीज  आढळल्या आहेत. म्हणून, लक्षण नसलेल्या किंवा कमी लक्षणे असलेल्या कोरोना संक्रमित  लोकांना देखील लसीकरण करणे महत्वाचे असणार आहे. 

संबंधित बातम्या