ऑस्ट्रेलिया, सिंगापूरसाठी विमान सेवेसाठी प्रयत्न

पीटीआय
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

कोरोना संसर्गामुळे सध्या आंतराष्ट्रीय विमान सेवा स्थगित असली तरी आगामी काळात ऑस्ट्रेलिया,जपान,सिंगापूरसह १३ देशांसाठी ठराविक कालावधीसाठी थेट विमान सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे हवाई वाहतुक मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी आज म्हटले आहे.

नवी दिल्ली:  कोरोना संसर्गामुळे सध्या आंतराष्ट्रीय विमान सेवा स्थगित असली तरी आगामी काळात ऑस्ट्रेलिया,जपान,सिंगापूरसह १३ देशांसाठी ठराविक कालावधीसाठी थेट विमान सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे हवाई वाहतुक मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी आज म्हटले आहे. यापूर्वी भारताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, यूएई, कतार आणि मालदिव यांच्याशी प्रवासासाठी करार केला आहे. 

पुरी यांनी म्हटले आहे की, आणखी १३ देशांसमवेत थेट सेवेबाबत विचार सुरू आहे. या देशांत ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, न्यूझीलंड, नायजेरिया, बहारिन, इस्त्राइल, केनिया, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलंडचा समावेश आहे. एवढेच नाही तर शेजारील देश श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि भूतानसमवेतदेखील प्रवासासाठी प्रस्ताव तयार केले आहेत.

दरम्यान, दिल्ली विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लवकरच कोविड-१९ चाचणी सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 

संबंधित बातम्या