डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन
TWITER 2.jpg

डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन

सोशल मिडिया(Social media) कंपनी ट्विटर (Twitter) आता डिजिटल नियम (Digital rules) 2021 चे पालन करण्यासंबंधी नरम होताना दिसत आहे. डिजिटल नियमांचे योग्य ते पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने केंद्र सरकारला (Central Government) सांगितले. तसेच याबाबत आता एका आठवड्यामध्ये नव्या डिजिटल नियमांचे पालन करण्याबाबत झालेल्या प्रगतीचा तपशील सादर करु असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Information Technology) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटविल्याच्या वादाच्या पाश्वभूमीवर डिजिटल नियमांचे पालन करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. (Efforts to ensure compliance with digital rules Twitters assurance)

गुगल (Google), फेसबुक(Facebook) यासह अनेक कंपन्यांनी डिजिटल नियमांनुसार तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करणयासाठी पावले उचलली आहेत. मात्र केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद कमी होताना दिसत नव्हता. दरम्यान, ट्विटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमची कंपनी भारतामध्ये सेवा देण्यासंदर्भात वचनबध्द आहे. तसेच जनसंवाद मंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्वाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकारला आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा तपशील सांगण्यात आला आहे. आम्ही केंद्र सरकारशी संवाद सुरु ठेवू त्याचबरोबर एका आठड्यामध्ये कंपनी भारत सरकारला नवीन निर्णयांचा अहवाल सादर करु, असे कंपनीने म्हटले आहे.

मागील दीड वर्षामध्ये ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात अनेक विषयांवर तीव्र स्वरुपाचे मतभेद निर्माण झाले आहेत. शेतकरी आंदोलनच्या वेळी ट्विटर टूल किटचा मुद्दा समोर आला होता. त्यांनतर कॉंग्रेसच्या (Congress) टूलकिट संदर्भामध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी ट्विटरवर देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com