होमिओपॅथीक औषध घेतल्यामुळे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

या घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला असून, इतर 5 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना महामारीच्या या काळात कोरोना विषाणूच्या संक्रमानामुळे हजारो लोकांचे प्राण जाता आहेत. कोरोना बाधित होण्याचे, मृतांचे आकडे दिवसागणिक वाढत जाताना दिसता आहेत. मात्र दुसरीकडे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये देखील लोकांचा मृत्यू होताना दिसतो आहे. अशातच आज छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) होमिओपॅथीचे (Homeopathy) एक औषध घेतल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. (8 members of the same family die due to taking homeopathic medicine in chhattisgarh)

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर लाठ्या काठ्यांंनी हल्ला केला; पहा व्हिडीओ 

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून या लाटेसोबतच वेगवेगळ्या दुर्घटना देखील मोठ्या प्रमाणात घडताना  दिसता आहेत. छत्तीसगडच्या विलासपूरमध्ये एका कुटुंबाने एका होमिओपॅथीक औषधाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 8 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. "होमिओपॅथीच्या ड्रॉसेरा 30 नामक एका औषधाचे या लोकांनी सेवन केले होते, ज्या औषधामध्ये देशी पद्धतिने बनवलेल्या दारूचे 91 टक्के एवढे प्रमाण होते" अशी माहिती सीएमओ,विलासपुर (Vilaspur) यांच्याकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, या गंभीर घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला असून, इतर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये औषधांचे चुकीच्या पद्धतीने, किंवा अतिरिक्त सेवन केल्याने आशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातदेखील अनेक ठिकाणी कोरोना (Corona) विरोधी औषधांच्या नावे डॉक्टरांच्या सल्याशिवाय चुकीच्या औषधी दिल्या जात असल्याचे पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या