नातवाला कोरोनापासून वाचवण्यासाठी वृद्ध दाम्पत्याने रेल्वेसमोर उडी घेतली

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

आपल्या नातवाला कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोनाची बाधा झालेल्या वृद्ध दाम्पत्याने रेल्वे समोर उडी घेतली.

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. दिवसाला हजारो लोकांचे कोरोना संसर्गामुळे जीव जाता आहेत. मात्र विशेष बाब ही आहे की अनेक जणांचे जीव कोरोनामुळे नाही तर कोरोनाच्या भीतीमुळे जाता आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या (Rajasthan) कोटा शहरात घडली आहे. आपल्या नातवाला कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोनाची बाधा झालेल्या वृद्ध दाम्पत्याने रेल्वे समोर उडी घेतली. (The elderly couple jumped in front of the train to save their granddaughter from the corona)

कोरोना विषाणूची (Corona Virus) बाधा झाल्या नंतर आपल्या पासून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठे असते. याच गोष्टीची भीती वाटल्याने एका वृद्ध दाम्पत्याने थेट जीव देण्याचा निर्णय घेतला. या वृद्ध दाम्पत्याचा कोरोना चाचणीचा अहवाल सकरात्मक आला होता. आणि यामुळे आपल्या परिवारातील सदस्यांना विशेष करून आपल्या 19 वर्षीय नातवाला कोरोना होईल या भीतीने घरी न जाता थेट रेल्वे समोर जीव दिला. दिल्ली -मुंबई रेल्वे ट्रॅकवर वृद्ध दाम्पत्याने उडी घेऊन जीव दिल्याची माहिती रेल्वेने दिल्याचे कोटा(Kota)  शहराचे एसपी बी.एस. हिंगड यांनी दिली आहे.

West Bengal Results: निवडणूक जिंकवणारा "खेला होबे" हा नारा आला कुठून ?

दरम्यान, या वृद्ध दाम्पत्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला ८ वर्षाआधी झालेल्या एका दुर्घटनेत गमावले आहे. त्यांनतर त्यांना आपल्या एकुलत्या एक नातवाची तसेच कुटुंबाची अत्यंत काळजी वाटत होती. त्यांना काही होऊ नये अशी भीती वाटत होती आणि याच भीतीपोटी या दाम्पत्याने आपले जीवन समोवले असल्याची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे

संबंधित बातम्या