बिहार विधानसभा अध्यक्षांची आज निवड

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

विधानसभा सचिवालयाच्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते विजयकुमार सिन्हा यांनी ‘एनडीए’च्या वतीने आणि राष्ट्रीय जनता दलाचे अवध बिहारी चौधरी यांनी महाआघाडीच्या वतीने अर्ज भरले आहेत. 

पाटणा:  बिहारमधील नव्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी महाआघाडीकडून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरले.

याद्वारे या दोन्ही आघाड्यांच्या सभागृहातील वर्चस्वाची पहिली परीक्षा होणार आहे. अध्यक्षपदासाठी बुधवारी (ता. २५) मतदान होणार आहे. विधानसभा सचिवालयाच्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते विजयकुमार सिन्हा यांनी ‘एनडीए’च्या वतीने आणि राष्ट्रीय जनता दलाचे अवध बिहारी चौधरी यांनी महाआघाडीच्या वतीने अर्ज भरले आहेत. 

संबंधित बातम्या