West Bengal Election : ममता बॅनर्जी याना निवडणूक आयोगाचा झटका

दैनिक गोमन्तक
बुधवार, 7 एप्रिल 2021

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना पुढील 48 तासांत पाठवलेल्या नोटिसवर उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने काल मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेत तक्रार दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी नोटीस बजावली आहे. (The Election Commission has issued a notice to Mamata Banerjee)

लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि महाराष्ट्राची चांगलीच जुंपली

ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीतील प्रचारात मुस्लिम मतदारांना एकत्र येण्याचे आणि टीएमसीला आपले मत देण्याचे आवाहन केले होते, असा आरोप ठेवत भाजपने ममता बॅनर्जी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावत त्यांच्या टिप्पणीने आदर्श आचारसंहितेतील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे जाहीर सभेत बोलताना हे भाष्य केले होते. 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कामाच्या ठिकाणी उपलब्ध होणार लस

भाजपचे (BJP) नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ममता बॅनर्जी यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन सातत्याने होत असल्याचे म्हटले होते. टीएमसीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका विशिष्ट धर्माच्या जनतेला एकत्र येऊन टीएमसीला मतदान करावे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले असल्याचे मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडे तक्रार करून ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नोटिसनुसार ममता बॅनर्जी यांनी, ''मी माझ्या अल्पसंख्याक बंधू-भगिनींना हात जोडून विनवणी करीत आहे, भाजपाकडून पैसे घेतलेल्या सैतानाचे ऐकून अल्पसंख्याकांची मते विभागू नका. ते भाजपचे एक प्रेषित असून ते भाजपाचे भागीदार आहेत. अल्पसंख्याकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने दिलेल्या पैशांसह सीपीएम आणि बीआयपीचे कार्यकर्ते फिरत आहेत,'' असे म्हटले होते.    

संबंधित बातम्या