निवडणूक आयोगाचा हनुमानाच्या भक्ताला मोठा धक्का; चिराग पासवानांच्या पक्षाचे चिन्ह गोठवले
Chirag PaswanDainik Gomantak

निवडणूक आयोगाचा हनुमानाच्या भक्ताला मोठा धक्का; चिराग पासवानांच्या पक्षाचे चिन्ह गोठवले

पशुपती कुमार पारस यांच्या कार्यक्रमात झालेल्या संघर्षादरम्यान लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) चिन्ह गोठवले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) दोन गटांमधील "वाद" मिटवण्यापर्यंत एलजेपीचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. "4 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला जाईल. बिहारच्या दोन विधानसभा पोटनिवडणुकांच्या जागांसाठी नामांकन प्रक्रिया सुरु आहे.

Chirag Paswan
गांधीजींना आठवत मोदींचे स्वच्छ भारत मिशन 2.0 !

खरं तर, निवडणूक संस्था या प्रकरणात तीन पर्यायांचा विचार करत होती: 1. अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षाचे चिन्ह अंतरिम आदेशाने गोठवणे आणि पक्षाच्या दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हावर पोटनिवडणूक लढण्याची परवानगी देणे; 2. लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांच्या गटासह निवडणूक चिन्ह चालू ठेवणे 3. पशुपती पारसाच्या गटाला LJP पक्षाचे चिन्ह देणे.

Related Stories

No stories found.